Share

ममता बॅनर्जीनी काढला फतवा, चार तासात हजर होण्याचे डॉक्टरांना दिले आदेश

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम बंगालमध्ये डॉक्टारांचा वाद चिघळला आहे. येथील ज्युनिअर डॉक्टर आंदोलन करत आहेत. तर या आंदोलनाचे समर्थन करत सीनिअर डॉक्टरांनी देखील पाठींबा दिला आहे. यामुळे बंगालमधील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. यावर प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संपावर गेलेल्या डॉक्टरांना चार तासात हजार होण्याचे आदेश दिले आहेत.

यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, जे डॉक्टर कामावर परतणार नाही, त्यांनी रुग्णालय सोडावे. ते बाहेरचे आहेत. सरकार त्यांचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करणार नाही. मी अशा डॉक्टरांचा निषेध करते की, जे संपावर गेले आहेत. एका पोलिसाचा ड्युटीवर असताना मृत्यू होतो. मात्र, पोलीस संपावर जात नाहीत.

दरम्यान, एनआरएसच्या रुग्णालयाच्या एका ज्युनिअर डॉक्टरला सोमवारी मारहाण झाली होती. या मारहाणीच्या घटनेत डॉक्टर गंभीररित्या जखमी झाला. त्यांना त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोलकात्यामधील रुग्णालयातील ज्युनिअर डॉक्टरांनी काम बंद केले आणि सुरक्षा पुरवण्याची मागणी करत आंदोलन छेडले.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!