औरंगाबाद : महानगर पालिकेची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. त्यात मनपाची कर वसूली कधीच पूर्ण होत नाही. आता या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित किंवा सरळ बडतर्फ करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत. कर वसूली संदर्भात पांडेय यांनी प्रभागांच्या बैठकी घेतल्या. या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांना कर वसूली संदर्भात कडक सूचना दिल्या.
या बैठकीत संबंधित विभाग प्रमुख, पालक अधिकारी, वार्ड अधिकारी तसेच सर्व वसुली कर्मचारी यांच्या कडून पांडेय यांनी आढावा घेतला. याबाबत आढावा घेत असताना वसुली संदर्भात कुठलेही प्रगती दिसून न आल्याने प्रशासक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे वसुलीच्या कामात बेजबाबदारपणा आणि दिरंगाई दिसून आल्यास संबंधित कर्मचाऱ्यास निलंबित किंवा बडतर्फ करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
कर वसुलीचे काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली किंवा त्यास अतिरिक्त कार्यभार देऊ नये असे आदेश त्यांनी दिले. यावेळी प्रशासकांनी प्रत्येक वसुली लिपिक आणि कर्मचारी यांची विचारपूस केली असता ‘डिमांड बिल’ वाटपचे काम अजूनही अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. यावर तीव्र नाराजी व्यक्त करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले अधिकारांचा वापर प्रभावीपणे करून दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची सक्त ताकीद दिली. वसुलीच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, तसेच मागील काळात कर वसुली प्रणालीत ज्या त्रुटी आणि चूका झाल्या असतील त्या पुन्हा पुन्हा होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘यापूर्वी तीन नगरसेवकांचा प्रभाग असताना राष्ट्रवादीला यश मिळाले होते,आताही पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देतील’
- उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासाठी नाही तर पदासाठी तडजोड केली; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
- ओबीसी आरक्षण अध्यादेशावर राज्यपाल आज सही करतील अशी अपेक्षा-हसन मुश्रीफ
- ठरलं ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठे बहुसदस्यीय तर कुठे एक सदस्यीय
- पुण्यात उभं राहणार साखर संग्रहालय; राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

