Share

‘ तुमच्यातील ‘एक माय का लाल’ दाखवून जो सलग १४ वेळा निवडणूक जिंकला असेल.’ – शरद पवार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ” आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना ५० हजार कोटी दिले. यांनी कर्जमाफी दिल्याचा पत्ता नाही म्हणूनच राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नुसती उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारार्थ बार्शीमध्ये सभेत ते बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले, ” राज्याच्या राजकारणात बदल करण्यासाठी मी लोकांशी संपर्क साधतो आहे. काही लोक विकासाचे नाव सांगून सोडून गेले. बार्शीकर अशा पळपुट्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. हे शिवाजी महाराजांच्या नावाचे राजकारण करत सत्तेत आल्यावर अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक बांधण्याचे खोटे आश्वासन दिले. छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा जपणारे गडकिल्लेही पर्यटनासाठी खुले केले. हीच किल्ल्यांची प्रतिष्ठा तुम्ही करता का ? असा प्रश्नही पवार यांनी यावेळी विचारत सरकारवर निशाणा साधला.

देशाचे गृहमंत्री म्हणतात, शरद पवार यांनी ५० वर्षांत काय केले? त्यांना एकच प्रश्न करतो की तुमच्यातील ‘एक माय का लाल’ दाखवून द्या जो सलग १४ वेळा निवडणूक जिंकला असेल, असे म्हणत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टोला लगावला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री म्हणत आहेत की, इथे सक्षम विरोधक नाहीत. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. पण कुस्ती पैलवनाशी होते, इतरांशी नाही. जर सत्ताधाऱ्यांच्या मते इथे काही ताकदीच्या निवडणुका नाहीत तर मग देशाचे पंतप्रधान राज्यात प्रचाराला कसे येतात, असा सवालही उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या : 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182993044036964359?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183000908457598976?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!