🕒 1 min read
मुंबई : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. या खेळात कुठल्या क्षणाला सामना कसा फिरु शकतो याचा अंदाज कोणीही करु शकत नाही. असाच एक प्रकार इंग्लंडमध्ये क्रिकेट क्लबच्या सामन्यात घडला आहे. पुरुष क्रिकेट क्लबच्या या सामन्यात इंग्लंडच्या एका माजी महिला क्रिकेटपटुने तिच्या १२ वर्षीय मुलासोबत शतकी भागीदारी करत विक्रम रचला.
इंग्लंडमध्ये लिंकॉल्न आँन्ड डीस्ट्रीक्ट या क्रिकेट क्लब स्पर्धेत ओम्बी सीसी या संघाकडून खेळताना इंग्लंडची ३९ वर्षीय माजी महिला क्रिकेटपटु अरण ब्रिंडल तिच्या १२ वर्षीय मुलासोबत सलामीला येत संघाला १० गडी राखुन विजय मिळवुन दिला. नेटलहॅम संघाने दिलेले १४२ धावांचे लक्ष्य एकही गडी न गमावता आई आणि मुलाने सहज पार केले. दोघांनी १४३ धावांची नाबाद शतकी भागीदारी करत हा विजय मिळवुन दिला. यात अरण ब्रिंडलने १०१ चेंडुत ९४ धावांची खेळी केली. तर तिचा मुलगा हॅरीने ३२ धावांची खेळी साकारली.
Mother and son, 143 run opening partnership from former @englandcricket ⭐️ Arran Brindle and her 12-year-old son Harry.
This is what cricket it all about ????@FirstTrojans @BBCSport @SkyCricket @cricketdistrict #FrogBox pic.twitter.com/QkNGzGewVt
— FrogBox Live (@Frogboxlive) May 24, 2021
या अनोख्या भागीदारीबाबत सर्वस्तरातुन कौतुक होत आहे. इंग्लंड पुरुष संघाचा माजी क्रिकेटपटु इयान बेलने ही ट्विट करत या भागीदारीचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘हे खुपच अप्रतिम आहे. या कुटुंबासाठी किती मोलाचा क्षण आहे. १२ वर्षिय मुलाची आई सोबत उत्तम कामगीरी’ असे ट्विट करत दोघांचो कौतुक केले आहे. अरण ब्रिंडलने इंग्लंडकडुन १३४ सामन्यात २८५२ धावा केल्या आहेत. तर २००५ साली अॅशेज या मानाच्या स्पर्धेत तिने इंग्लंडला विजय मिळवुन देण्यात मोलाची भूमिका साकारली होती. २०१४ साली अरण ब्रिंडलने निवृत्ती स्विकारली आहे.
This is wonderful! What a moment for the family. Lovely knock, 12-year-old Harry and mum, @brindlecricket! https://t.co/2zae7EaEOq
— Ian Bell MBE (@Ian_Bell) May 24, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियाचा ‘एक्स फॅक्टर’ जडेजा मुंबईत दाखल ; फोटो शेअर करत म्हणाला…
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- बारावीच्या परीक्षांचा निर्णय लवकरच; राज्य सरकारांना २५ मे पर्यंत सूचना देण्याची वेळनिलेश लंकेंच चहुबाजुंनी कौतुक; भाजप आमदार श्वेता महाले म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

