🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : आज खूप जड अंतःकरणाने एक कटू निर्णयमी घेत आहे. महायुतीने विधानसभा जागावाटपात शिवसेनेला कल्याण पश्चिमची जागा सोडून माझ्यावर अन्याय केला आहे. यावरुन व्यथित होऊन मी १ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मी कल्याण पश्चिम विधानसभेतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहे. त्यामुळे पक्षाला अडचण निर्माण होऊ नये यासाठी आज मी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे.’ अशी फेसबुक पोस्ट करत भाजपचे बंडखोर आमदार नरेंद्र पवारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.
पक्ष्साठी अविरतपणे काम करूनही विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेला देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या पवार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर आता ते कल्याण पश्चिममधून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत. निवडणुका तोंडावर ल्याने भाजप शिवसेना पक्षातील अनेक नेत्यांनी बंडखोरी केली. त्यांच्या बंडखोरीला आवरण्यासाठी पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. जागावाटपात भाजपकडे असणारा कल्याण पश्चिम मतदार संघ शिवसेनेकडे गेल्यामुळे पवार नाराज झाले होते. हा मतदार संघ ऐनवेळी शिवसेनेला दिल्यामुळे त्यांनी पक्षाने माझ्यावर अन्याय केला असे म्हणत राजीनामा दिला आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.
ते म्हणले, ”अशाप्रकारे मला पक्षापासून दूर जावे लागेल, असा विचारही कधी मनात आला नाही. कदाचित मी कुठे कमी पडलो, २०१४ मध्ये युती नसताना भाजपच्या तिकीटावर मी कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूक जिंकली. पक्षाने मला काम करण्याची संधी दिली तेव्हा मी कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन काम केलं.’अशा शब्दात पवारांनी त्यांनी खंत व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1182543372642209792?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182545554070364163?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

