मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लॉकडाऊनमधील भरमसाठ वाढीव वीजबिलांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलेत. सरकारमधील वीज मंत्री आधी वीज बिल कमी करु असं म्हटले. मात्र, अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आल्यावर सरकारने कोणतंही वीजबिल माफ करणार नाही, अशी भूमिका घेतली. सरकार वीज कंपन्यांना पाठिशी घालत आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय.
राज ठाकरे म्हणाले, “सरकार इतकं निर्दयीपणे कसं वागू शकतं कळत नाहीये. मुलांच्या परीक्षांचा विचार नाही करायचा, कशाचाच विचार नाही करायचा. वीज बिल माफ होण्यासाठी वीज कंपन्यांबरोबर चर्चा कराव्या लागतील. पण या चर्चा थांबल्या आहेत. काही तरी लेणदेण झाल्याशिवाय या चर्चा थांबणार नाहीत. सरकार सर्व वीज कंपन्यांना पाठिशी घालण्याचं काम करत आहे.”
सरकार आंदोलन केल्यावर आंदोलकांवर गुन्हे दाखल करतंय, वीज बिल माफही करत नाही. लोकांना भरमसाठ वीज बिलं भरण्यास सांगितलं जातंय. हे सगळं कुणासाठी सुरु आहे? असाही सवाल राज ठाकरेंनी विचारला.
राज ठाकरेंच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांना अनेक लोकं भेटत राहतात. त्यामुळे अडाणी त्यांना भेटले म्हणून काही घडलं असे नाही. अस म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंना उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गरीब मराठा’ हा शब्द मी आणलाय’
- फडणवीसांनी मराठा समाजाची दिशाभूल केलीये; समाजाने EWSच आरक्षण स्वीकारावं – संभाजी ब्रिगेड
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात’
- ‘ते आले, त्यांनी पाहिलं आणि जिंकलं !’


