🕒 1 min read
पुणे : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपाला धक्का बसला आहे. पहिल्या पाचही फेरीमध्ये भाजपाची पिछेहाट आहे. महाविकास आघाडीनं भाजपाच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर मतदार संघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.आघाडीचा तब्बल ५० वर्षांनी महाविजय या मतदारसंघात झाला आहे.
दरम्यान, मराठवाडा मतदारसंघात सतिश चव्हाण विजयी झाले आहेत, नागपूर पदवीधर मतदारसंघात आघाडीचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत. तर पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांनी बाजी मारली आहे.
इकडे पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला.एक डिसेंबरला या मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर काल (गुरुवार) या निवडणुकांच्या मतमोजणीस सुरुवात झाली होती.
दरम्यान, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून हाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण तर त्यांच्याविरोधात भाजपचे शिरीष बोराळकर निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये सतीश चव्हाणांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.
यावर कॉंग्रेसच नेते आणि मंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. ‘नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार, काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांचा विजय म्हणजे दीक्षाभूमीचा ‘संघ’भूमीवर विजय आहे.नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या विजयाचा विशेष आनंद होत असून यासाठी हातभार लावणाऱ्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार’! अस नितीन राऊत म्हणाले आहेत.
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार, काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांचा विजय म्हणजे दीक्षाभूमीचा 'संघ'भूमीवर विजय आहे.नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या विजयाचा विशेष आनंद होत असून यासाठी हातभार लावणाऱ्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार!
— Dr. Nitin Raut ???????? (@NitinRaut_INC) December 4, 2020
महत्वाच्या बातम्या
- कंगनासाठी ओरडणारे फडणवीस शेतकऱ्यांविषयी गप्प का ?
- महाराष्ट्रासह ९ राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर ईडीचे छापे…
- १०५ चे १५० होतील हा फडणवीसांचा भ्रमाचा भोपळा फुटला – सचिन सावंत
- आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांचे मानले आभार
- पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली कोरोना स्थितीसंदर्भात सर्वपक्षीय बैठकीबाबत राहुल गांधी म्हणाले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

