Share

नियोजनात चुका होत असल्याने रुग्ण वाढत आहेत – नितेश राणे

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 2916 वर पोहचली आहे. काल नव्याने 232 रुग्णांची नोंद झाली. आज दिवसभरात 36 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यभरातील 295 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत राज्यात 52 हजार कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर शाब्दिक निशाणा साधला आहे. ते म्हणतात, ‘सरकारचे काम मोजायची फुटपट्टी म्हणजे रुग्ण किती वाढले. केरळात आपल्यापेक्षा जास्त रूग्ण होते मात्र तेथील प्रशासनाने योग्य नियोजन करून काम केले , त्याचा परिणाम दिसला. तेथील रुग्ण कमी झाले’.

पुढे राणे म्हणाले, ‘राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी का वाढत आहे? शासन आणि प्रशासन काय करतय? नियोजनात चुका होत असल्याने रुग्ण वाढत आहेत,’ असं म्हणत ठाकरे सरकारवर नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे. असं वृत्त सरकारनामा ने दिलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे सांगत आहेत, घरी बसा आम्ही धान्य देतो. पण लोकांना धान्य मिळालेलं नाही. लोक उपाशी आहेत. मुख्यमंत्री टीव्हीवरून जे सांगत आहेत. तस घडत नाही,’ असं देखील नारायण राणे म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!