Share

‘जलसंपदा विभागानं फडणवीसांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात उत्तम कामगिरी केली’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- जलसंपदा विभागानं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात उत्तम कामगिरी केली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. लघु आणि सूक्ष्म उद्योगाला चालना देण्यासाठी आणि अधिकाधिक रोजगार वाढावेत यादृष्टीने केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात तरतुदी केल्या असल्याचेही त्यांनी सांगितलं.

एअर इंडिया, बीएसएनएल आणि एमटीएनएलच्‍या खाजगीकरणाबाबतची चर्चा झाली आहे, मात्र कोणताही निर्णय झाला नाही असं एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं. राफेल विमानाच्या शस्त्रपूजेचं त्यांनी समर्थन केलं.

राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवून पूजा केली तर त्यात गैर काय असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे. सीतारामन म्हणाल्या की, ही भारतीय परंपरा आहे. अशी पूजा करण्यात गैर काय ? मग पंतप्रधान मोदी म चाँद पे जा रहे है, और कही लोक लिंबू मिर्ची पे अटके हैं, असे म्हणतात, त्यावर खुलासा करताना त्या म्हणाल्या, याचा अर्थ आम्ही विज्ञान सोडला असा नाही. मी सुद्धा देवी पूजन करते. विजयादशमीचा दिवशी शस्त्रपूज करणे ही आमची परंपरा आहे. त्यातून अंधविश्वास पसरविणे हा हेतू नाही.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182908437279072257?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182903938229526528?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!