🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- गेल्या वर्षीपासून राफेल विमान हा विषय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत राहिला आहे. मंगळवारी बहुप्रतीक्षीत आणि बहुचर्चित असे राफेल फ्रान्स सरकारने भारताला सुपुर्द केले. त्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमी निमित्त राफेलचे शस्त्रपूजन केले. मात्र, राफेलच्या या पूजनामुळे नेटीझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवून पूजा केली तर त्यात गैर काय असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी फ्रान्समध्ये राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवून पूजा केली. त्यासंदर्भात पुण्यात पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. त्या पुण्यात बोलत होत्या.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ही भारतीय परंपरा आहे. अशी पूजा करण्यात गैर काय ? मग पंतप्रधान मोदी म चाँद पे जा रहे है, और कही लोक लिंबू मिर्ची पे अटके हैं, असे म्हणतात, त्यावर खुलासा करताना त्या म्हणाल्या, याचा अर्थ आम्ही विज्ञान सोडला असा नाही. मी सुद्धा देवी पूजन करते. विजयादशमीचा दिवशी शस्त्रपूज करणे ही आमची परंपरा आहे. त्यातून अंधविश्वास पसरविणे हा हेतू नाही.
दरम्यान, ‘मला जे योग्य वाटते तेच मी करतो. या विश्वात एक महाशक्ती आहे, अशी माझी श्रद्धा आहे. तसेच माझासुद्धा लहानपणापासून या गोष्टींवर विश्वास आहे’, असे राजनाथ सिंह यांनी भारतात परतल्यावर म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182581064692162561?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182581038083538944?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

