Share

घोटाळेबाज नीरव मोदीला भारतीय तपास यंत्रणेचा दणका, स्विस बँकेतील चार खाती गोठवली

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून पळून गेलेल्या घोटाळेबाज निरव मोदीला भारतीय तपास यंत्रणेने चांगलाच दणका दिला आहे. स्विस बँकेतील नीरव मोदीच्या संबंधित असलेले चार बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये २८३.१६ कोटी रुपये जमा होते.

पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून फरार झालेला नीरव मोदी सध्या लंडनच्या वडस्वर्थ कारागृहात आहे. त्याने आपल्याला जामीन मिळावा आणि आपले प्रत्यार्पण रोखावे यासाठी त्याने तेथील न्यायालयात चार वेळा याचिका दाखल केल्या आहे. तर त्याच्या सगळ्या याचिका आतातपर्यंत न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.

या प्रकरणात स्विस बँकेकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. ज्यात लिहिलं आहे की, भारताच्या तपास यंत्रणाकडून होणाऱ्या मागणीनंतर नीरव मोदी यांच्याशी संबंधित चार बँक खाती गोठविण्यात आली आहेत. या प्रकरणात सलग दुसऱ्यांदा भारतीय तपास यंत्रणांना यश मिळालं आहे. याआधी बुधवारी या घोटाळ्यातील दुसरा आरोप मेहुल चोक्सीला भारतात प्रत्यार्पण करण्याचा अडथळा दूर झाला आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!