नांदेड : नांदेड येथील आरोपीने केरळ राज्यातील मल्लपुरम येथील जिल्हा न्यायाधीश के. पी. जॉन पिन्सीपल यांचे नेटबँकिंगची माहिती हॅक करून खात्यातून सव्वा लाख रुपये लांबवले. याप्रकरणी केरळ राज्यातील मल्लपुरम जिल्ह्यात मंजेरी येथील पोलिस ठाण्यात शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. केरळच्या सायबर फॉरेन्सिक टीमने दिलेल्या माहितीनुसार आरोपीला त्याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शनिवारी नांदेड येथे अटक केली
नांदेड येथील पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना केरळ राज्यातील मंजेरी येथील सायबर फॉरेन्सिक टीमने गुन्ह्याविषयी माहिती दिली. यामाहितीच्या आधारे पोलीस आधिक्षकांनी आरोपीचा शोध घेण्याबाबत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गु्न्हा शाखेने सहायक पोलिस निरीक्षक पी.डी. भारती व कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले. या पथकाने शनिवारी पहाटे एकोणावीस वर्षीय आरोपी ओंकार संजय चातरवाड याला ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी त्याला मंजेरी, मल्लपुरम येथील सायबर फॉरेन्सिक टीमच्या स्वाधीन केले.
नांदेड येथील आरोपी ओंकार संजय चातरवाड आणि सहकाऱ्यांनी १२ डिसेंबर २०२० रोजी केरळ राज्यातील जिल्हा न्यायाधीश के. पी. जॉन पिन्सीपल यांचे नेटबँकिंगचे डिटेल्स युझरनेम व पासवर्ड हॅक करून त्यांच्या खात्यातून एक लाख २६ हजार ९१ रुपये हॅक केले. या पैशातून त्याने वस्तूंची खरेदी केली. तसेच नंतर खरेदी कॅन्सल करून सदरील एक लाख २६ हजार ९१ रुपये स्वत:च्या खात्यावर वळती करून काढून घेतले. त्याने असे अनेकांना फसविले असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- माधुरी-आमिर पुन्हा येणार एकत्र; दिल चित्रपटाचा लवकरच रिमेक
- पँथरची पुर्वीपेक्षाही आजची आवश्यकता जास्त- रमेश खंडागळे
- डिजिटल पेमेंट युजर्स साठी महत्वाचे ‘हे’ पेमेंट अॅप होतेय बंद !
- माधुरीच्या ‘धकधक’ गाण्यावर अंकिताचा हॉट डान्स; व्हिडीओ व्हायरल
- आम्ही शरजील उस्मानी सोबत आहोत; एल्गार परिषदेच्या आयोजकांचा पुनरुच्चार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

