Share

शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिध्द… पहा काय आहेत महत्त्वाचे मुद्दे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (ता. १२) शिवसेनेचा वचननामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. यात दहा रुपयांत गोरगरीबांना अन्न पुरविणे, शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी दहा हजार रुपये जमा करणे, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे अशा विविध आश्वासनाचा पाऊस पाडण्यात आला आहे. महिला, युवा सक्षमीकरण, शेतकऱ्यांसाठी योजना, शिक्षण सुविधा, गरम विकास, शहर विकास, वीज निर्मिती व दर कपात, आरोग्य सुविधा, सन्मान निराधारांना, स्वच्छता व पर्यावरण उद्योग व रोजगार गृहनिर्माण, पर्यटन, कला आणि संकृती, सामाजिक न्याय आदि विषयांवर जा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे.

लाखो लोकांशी चर्चा करून जाहीरनामा तयार केला आहे. तसेच राजाच्या तिजोरीवर किती भर पडेल याचा विचार करूनच या जाहीरनाम्यात मी विचारपूर्वक वचनं दिली आहेत. असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. त्याचप्रमाणे ” सर्वांच्या मागण्यांचा आणि सर्व बाबींचा सखोल विचार करून हा वचननामा तयार केला आहे. हा वचननामा तयार करताना महिला वर्गांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बारकोडही देण्यात आला आहे,” असे स्पष्टीकरण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं.

– आर्थिकदृष्ट्या दुर्लाब कुटुंबातील मुलीना महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य.
– शेतमजूर आणि असंघटीत महिला कामगारांसाठी समान काम समान वेतन आणि आरोग्य सुविधांची तरतूद करणार.
– राज्यातील १५ लाख पदवीधरांना युवा सरकार फेलो मार्फत शिष्यवृत्तीची संधी देणार.
– उच्च व तंत्र शिक्षणाचे अभ्यासक्रम व परीक्षा पाद्दतींमध्ये बदल करून रोजगाराभिमुख शिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करणार
– शेती क्षेत्र्वादिसाठी अल्पभूधारक व आर्थिक दुर्लाब घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १० हजार रुपये दरवर्षी जमा करणार
– शेतीतील उत्पादन खर कमी करण्यासाठी बी- बियाणांच्या किमती पुढील पाच वर्ष स्थिर ठेवणार.
– शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार .
– तालुका स्तरावर गाव ते शाळा / महाविद्यालय सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी एक्सप्रेस या २५०० विशेष बसची सेवा सुरु करणार.
– राज्यातील सर्व शाळातील विद्यार्ठीनिना स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देणार.
– शेती आणि पिण्याच्या पाण्याचे गरज लक्षात घेऊन राज्यातील महत्त्वाचे रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी अर्थ संकल्पात भरीव तरतूद करणार.
– घरगुती वीज दर ३० टक्क्यांनी कमी करणार
– सर्व जिल्ह्यांमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिस्ट हॉस्पीटल उभारणार.
– दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राम्नाध्ये रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी रियल टाइम मेडिसिन या प्रणालीचा वापर राज्यभर करणार
– राज्य शासनातील सरकारी नोकरीतील सर्व स्तरातील सर्व रिक्त पडे भरणार.
– ग्रामीण भागातीलशेती अधारिक उद्योगांना चालना देण्यासाठी कौशल्य विकास आणि स्टार्टअप केंद्रांची संकुले उभारणार
– पोलीस भरतीत पूर्वीप्रमाणे प्रथम मैदानी व नंतर लेखी परीक्षा घेणार
– पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री आवास योजना अमलात आणून राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वत:चे घर उपलब्ध करून देणार
– राज्यातील सर्व गावांमधील पारंपारिक धार्मिक स्थळांचे सामाजिक महत्व लक्षात घेऊन दुरूस्ती व देखभालीसाठी अनुदान देणार
– राज्यातील सर्व खेड्यांतील रस्ते बारमाही टिकाऊ करण्याचे धोरण आखणार
– १ रुपयात आरोग्य चाचणी सुविधा देण्यासाठी राज्यभरात ‘१ रुपी क्लिनिक’ सुरु करणार.

महत्त्वाच्या बातम्या : 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182896498758959104?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182900691615879169?s=20

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!