🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभेला रंग चढत आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाचा उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासने देत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आणि उमेदवारांनी कंबर कसली असतना चंद्रपूरच्या चिमूर मतदारसंघातील एका महिला उमेदवाराने ‘ गाव तिथे बियर बार ‘ अशी घोषणा करत प्रचाराचा बार उडवला.
निवडणुकांच्या चर्चेत राहण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या मार्गाने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र चंद्रपूर जिल्ह्याच्या ज्या गावात दारूबंदी आहे त्याच मतदार संघाच्या अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी यांनी ‘गाव तिथे बियर बार’अशी घोषणा करुन दारूला समर्थन दिले आहे. राऊत यांनी थेट जाहीरनामा प्रकाशित करत दारुच्या समर्थनाची घोषणा देत प्रचाराचा बार उडवला. त्यांच्या या घोषणेने सध्या चंद्रपुरात सर्वत्र या घोषणेची चर्चा होत आहे.
बेरोजगार तरुणांना दारु विक्रीचे परवाने, गाव तिथं बिअर बार, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सवलतीत दारु, अशा घोषणा राऊत यांनी दिल्या. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपूर्वी झालेल्या दारुबंदीची योजना किती फसली हेही त्यांनी या पत्रकात नमूद करुन, मी निवडून आल्यास दारुबंदी कशी हटवता येईल, याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. चिमूर तालुक्यातील पेंढरीमध्ये राहणाऱ्या राऊत यांनी दारूबंदीच्या, गाव तिथे बियर बार अशा मुद्द्यावरून प्रचाराला सुरुवात केल्याने या अजब घोषणांची आता चर्चा होऊ लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1182964519930253312?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182964788734783488?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

