Share

अन् थोडक्यात मुख्यमंत्री अपघातातून बचावले…

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सर्वच नेत्यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते राज्यभरात दौरे करत आहेत. मुख्यमंत्री अलिबागच्या दौऱ्यावर असताना गालबोट लागणारी घटना आज घडली. अलिबागच्या पेण येथील बोरगावात फडणवीस यांचे हेलिकॉप्टर लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले. मात्र प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवले आणि अपघात टळला.

ही घटना सामान्य असून सध्या मुख्यमंत्री सुखरुप असल्याची माहिती जिल्हा पोलीस यंत्रणांनी दिली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये फडणवीस यांच्यासोबत त्याचा पीए, एक इंजिनिअर, एक पायलट आणि को-पायलट हे पाचजण बसले होते. हेलिगो चार्टर प्रायव्हेट लिमिटेडचे हे हेलिकॉप्टर आहे. या अपघातानंतरही त्यांनी प्रचारसभा घेतली आणि जोरदार भाषण केले. त्यांच्या चेहऱ्यावर अपघाताचे भाव दिसत नव्हते.

दरम्यान, पाऊस पडल्याने जमीन ओली झाली होती. त्यामुळे पेण-बोरगाव येथील हेलिपॅडवर चिखल साचला होता. सायंकाळी चारच्या सुमारास पेण-बोरगाव येथे सात टन वजनाचे हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. तेव्हा खाली चिखल असल्याने हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतली गेली. पायलटच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अपघात होता होता टळला. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विमानाला अपघात होण्याची हि पहिलीच घटना नव्हती. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातूनही ते बचावले होते.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1182611613406224384?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182612857701068803?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!