🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली अनेक योजना आणल्या मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. महाराजांचा अपमान करणाऱ्यांना लोक माफ नाही. राज्यात परिवर्तन होईल, खासदार अमोल कोल्हे यांनी राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे बोलताना असे मत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचे प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार सभेत खासदार कोल्हे बोलत होते.
कोल्हे म्हणाले, अरबी समुद्रातील शिवस्मारक, शेतकऱ्यांची कर्जमाफी, गडकिल्ले भाडयाने देणे हे विषय पाहता युतीने जनतेला फक्त फसविले आहे. कर्जमाफीसाठी ६६ अटी लादल्या. आता युतीला मतदान करण्याकरिता अटी लावण्याची वेळ आली आहे. सुमारे एक लाखाहून अधिक कंपन्या बंद पडल्याने लाखो कामगार बेरोजगार झाले. शेतमालाला भाव मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकरी रडतो आहे, असे एक न अनेक प्रश आज सामान्य माणसाला भेडसावत आहे.”
तर तनपुरे म्हणाले, मतदारांनी परिवर्तन करायचे ठरविले असून जनतेचा पाठिंबा मिळत आहे. गेल्या दहा वर्षांत किती विकास झाला हे पाहिल्यामुळे आता मतदारांनी हरवायचं आहे मत कोणाला द्यायचे. गुन्हेगारीचा वाढता प्रश्न मुळासकट उपटून काढण्यासाठी आम्ह्नी कटिबध्द आहोत. तर पाण्याच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठविण्यासाठी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1183266308856504320?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183268018656178176?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

