Share

मी पंकजा मुंडेंची बहिण, त्यांच्यात आणि माझ्यात मतभेद नाहीत – राजळे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी पाथर्डीत बोलताना त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची मी बहीण आहे. पंकजा व माझ्यात मतभेद नाहीत. गोपीनाथ मुंडे यांचे आशीर्वाद व पंकजा मुंडे यांचे सहकार्य मी जन्मभर विसरू शकत नाही असं विधान केले आहे.

पुढे बोलताना राजळे यांनी पाथर्डी-शेवगाव दोन्ही तालुके मला कुटुंबाप्रमाणे वाटतात. फसवाफसवी हा आपला विषय नाही. लोकांना फसवल्यावर काय अवस्था होते त्याचा अनुभव विरोधकांनी घेतला आहे अशा शब्दात विरोधकांवर निशाना साधला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

दरम्यान, मोनिका राजळे या २०१४ ला भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या आहेत. त्यानंतर त्यांना २०१९ च्या निवडणुकीतही पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे राजळे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या दरम्यान त्या प्रत्यक्ष जावून मतदारांच्या गाठीभेटी घेत असल्याच पाहायला मिळत आहे.

मोनिका राजळे यांची प्रचाराला भाजपचे विस्तारक दिनकर गर्जे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, विधानसभा क्षेत्र प्रमुख नंदकुमार मोरे, ज्येष्ठ नेते अशोक चोरमले, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य ललिता शिरसाठ यांनी हजेरी लावली होती.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182888460819918849?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182886993669152768?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182886745987092482?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!