Share

१ जानेवारी २०२१ पासून एटीएम कार्डसाठी लागू होणार नवीन नियम; आरबीआयचा निर्णय !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: कोरोना संकट अजूनही निवाराले नसल्याने एकीकडे अर्थव्यवस्थेवर कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये करण्यात आलेल्या लोक डाऊन मध्ये झालेल्या परिणामांतून अर्थव्यवस्था हळूहळू सावरते आहे. या काळामध्ये बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे महागाई वाढली आहे. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या पतधोरण विषयक बैठकीमध्ये व्याजदर बदलण्यात आले नसले तरीदेखील अर्थव्यवस्थेच्या वृद्धि दारामध्ये सुधारणा होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी संपर्करहित कार्ड्स 2000 रुपयांवरून वाढवून 5000 रुपये केली आहे. 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे.

या तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्ड होल्डरला एखाद्या ठिकाणी पैसे भरताना स्वाइप करण्याची आवश्यकता नसते. पॉइंट ऑफ सेल (POS) मशीनच्या जवळ कार्ड नेल्यास पेमेंट होऊ शकते. कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्डमध्ये दोन प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जातात – ‘नियर फील्ड कम्युनिकेशन’ आणि ‘रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन’  (आरएफआयडी) जेव्हा या तंत्रज्ञानासह सुसज्ज असलेले कार्ड मशीनजवळ योग्य पद्धतीने आणल्यास, स्वयंचलितपणे पेमेंट केले जाते.

जर कार्ड मशीनच्या 2 ते 5 सेंटीमीटरच्या रेंजमध्ये असेल तरच पैसे भरता येऊ शकतात. यासाठी मशीनमध्ये कार्ड इनसर्ट करण्याची किंवा ते स्वाइप करण्याची आवश्यकता नाही. या प्रणालीमध्ये पिन किंवा ओटीपीची देखील आवश्यक नाही. कॉन्टॅक्टलेस देयकासाठी कमाल मर्यादा 2,000 रुपये होती. ती वाढवून आता 5 हजार करण्यात आली आहे. कोरोना काळात अशाप्रकारे मर्यादा वाढवल्यामुळे ग्राहकांना फायदाच होणार आहे. अशाप्रकारे एका दिवसात एकूण पाच संपर्कविहीन व्यवहार करता येतात. या रकमेपेक्षा जास्त देय देण्यासाठी, पिन किंवा ओटीपी आवश्यक आहे.

याशिवाय रिअल टाइन ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सेवा देखील  उपलब्ध करण्यास त्यांनी सांगितले आहे. पुढील आठवड्यापासून ही सेवा लागू करण्याचे सांगितले आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही आता RTGS च्या माध्यमातून 24 तास पैसे ट्रान्सफर करू शकता. सध्या ही सेवा केवळ महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार सोडल्यास आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवसात सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!