🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: 2016 पूर्वी बार्शी नगरपालिकेत आमची सत्ता असताना पाण्याचं योग्य नियोजन असल्यामुळे नागरीकांना अडचण आली नाही, शहरातील बहुतांश मार्ग आम्ही सिमेंटचे बांधले होते. परंतु आज पावसाळ्यात देखील तीन – तीन दिवस पाणी येत नाही. भुयारी गटाराच्या नावाखाली संपूर्ण शहर खोदण्यात आलं आहे. ज्यांना कामाचं नियोजन करता येत नाही त्यांना तुम्ही सत्ता देणार का ?, असा सवाल शिवसेना उमेदवार दिलीप सोपल यांनी केला आहे. बार्शी शहरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलते होते.
भुयारी गटाराचे कमी करताना एक एक प्रभाग घेत करणे गरजेचं होत. गटारासाठीचा टाकलेला पाईप आणि खोदलेल्या चारीचा कुठेही ताळमेळ लागत नाही. केवळ लक्ष्मी दर्शनासाठी हे काम करत असताना सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे आज शहराची दुर्दशा झाली असल्याची टीका दिलीप सोपल यांनी केली आहे.
निवडणूक आली की जातीपातीचे राजकारण केलं जातं. मात्र, एकवेळ सर्व जातीच्या जनतेने तुम्हाला आमदार केलं होतं. मला देखील सर्व जाती धर्मातील लोकांनी सहावेळा आमदार केलं आहे. त्यामुळे विरोधक पाहिजेत तसा जातीच्या राजकारणाचा वापर करत आहेत, असा आरोप सोपल यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182862457238220800?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182855708653436930?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

