🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून. सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं राजकीय पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्ला चढवला आहे. ते नागपूर येथे सभेदरम्यान बोलत होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीवर चांगलाच शाब्दिक निशाणा साधला.
यावेळी ते म्हणाले की, ‘आमच्या विरोधात लढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात किमान चांगले पैलवान तरी उतरवा. पळपुट्या विरोधकांमुळे निवडणूक लढण्यात मजा येत नाही,’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीला लक्ष केले.
दरम्यान, अकोला येथे पार पडलेल्या सभेदरम्यान फडणवीस यांनी पवारांवर निशाणा साधला. म्हणाले, ‘पवारसाहेब विदर्भामध्ये फिरतायत. शेतकरी आत्महत्या होतायत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कोणाच्या राज्यामध्ये सुरू झाल्या, शेतकरी आत्महत्या हे पाप तुमचं आहे, कारण या शेतकऱ्याच्या शेतीला तुम्ही पाणी पोहोचू दिलं नाही. तुमचे याठिकाणी मंत्री होते, तुम्ही केंद्रात कृषिमंत्री होतात. 15 वर्षं तुमचं सरकार होतं, असं म्हणत फडणवीस यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183235417639772160?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183234546059243522?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

