🕒 1 min read
मुंबई – आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून भाजप-सेनेला जेरीस आणणारे मनसे अध्यक्ष हे आता सभांमधून या दोन्ही पक्षांवर हल्ला चढवत आहेत.पण आता व्यंगचित्रांचे अस्त्र भाजप प्रभावीपणे वापरताना दिसत आहे. भाजपकडून रम्या नावाच्या पात्राद्वारे व्यंगचित्राच्या माध्यमातून विरोधकांवर फटकारे ओढले जात आहेत.
भाजपनं व्यंगचित्राच्या माध्यमातून थेट व्यंगचित्रकार असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरच ताशेर एढले आहेत. त्यांना ‘विरोधी पक्ष नेता’ व्हायचंय, पण जनतेने त्यांना ‘विनोदी पक्ष नेता’ केलंय. अनाकलनीय असल्याचं ट्वीटमध्ये भाजपनं म्हटलं आहे.
त्यांना 'विरोधी पक्ष नेता' व्हायचंय, पण जनतेने त्यांना 'विनोदी पक्ष नेता' केलंय ….
अनाकलनीय….!@RajThackeray pic.twitter.com/nU0LHp7rKc— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 11, 2019
दरम्यान,महाराष्ट्राला आज सक्षम, प्रबळ आणि कोणासमोरही घरंगळत न जाणाऱ्या विरोधी पक्षाची गरज असून ती संधी तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्या. सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मनसेच्या उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या प्रचारसभेतून महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182919086918864896?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182918845855461377?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

