🕒 1 min read
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो मधील बबीताजी म्हणजे अभिनेत्री मुनमुन दत्ताने काही दिवसांपूर्वीच जातिवाचक शब्दांचा वापर केल्याने देशभरातून मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी होऊ लागली होती. त्यानंतर मुनमुन दत्ताने सोशल मीडियावरून माफी मागितली तरी देखील लोकांमधील संताप कमी झालेला नाही. हे प्रकरण शांत होण्याआधीच आता अभिनेत्री युविका चौधरीन जातिवाचक शब्दांचा उल्लेख केल्याने नेटकरी आणखी संतापले आहेत.
रोडिस् फेम प्रिन्स नेरुलाची पत्नी अभिनेत्री युविका चौधरी चांगलीच चर्चेत आलीय. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून युविकाच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आहे. युविका सोशल मीडियावर अनेक व्लॉग शेअर करत असते. यातील तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून या व्हिडीओवर संताप व्यक्त केला जातोय.
https://twitter.com/vaibhavkr86/status/1397071965920239616?s=20
या व्हिडीओत युविकाचा पती प्रिन्स एका खुर्चीत बसलेला दिसतोय. तो हेअर स्टाईल करत असताना युविका हा व्हिडीओ शूट करताना दिसतेय. समोर आरसा असल्याने युविका व्हिडीओ शूट करताना स्पष्ट दिसतेय. यावेळी ती नेहमी व्हिडीओ शूट करताना मला छान तयार होता येत नाही असं बोलतेय. “नेहमी मी व्लॉग बनवते. तेव्हा मी का नेहमी **** सारखी येऊन उभी राहते. मला वेळचं मिळतं नाही की मी स्वत: ला व्यवस्थित दाखवू शकेन. मला खूप वाईट वाटतंय आणि हा मला व्लॉगसाठी वेळ देत नाही.” असं ती यात म्हणत आहे.
अनेक नेटकऱ्यांनी ट्विट करत युविकाच्या अटकेची मागणी केली आहे. त्यामुळे ट्विटरवर देखील #ArrestYuvikaChoudhary हा ट्रेंड सध्या पाहायला मिळतोय. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मुनमुन दत्ताने जातीवाचक शब्दांचा उल्लेख केल्याने तिला नेटकऱ्यांच्या संतापाला समोरं जावं लागलं होतं. तर देशात अनेक ठिकाणी मुनमुन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आशुतोष राणांनी अनोख्या पद्धतीने केल रेणुका शहाणे यांना प्रपोज; अशी आहे लव्हस्टोरी
- मोठी बातमी : दहावीच्या परीक्षांसह अकरावी प्रवेशाबाबत राज्य सरकार जीआर काढण्याची शक्यता !
- ‘ “रेनिसान्स स्टेट” या पुस्तकावर देशभरात कायमची बंदी घाला आणि विक्री झालेली पुस्तकं…’
- उस्मानाबादेत सूट द्यायलाच उशीर की लगेच तौबा गर्दी
- ‘राधे’ चित्रपटाची पायरेटेड कॉपी विकणा-यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकांवर येणार बंदी; हायकोर्टाचे कडक निर्देश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

