Share

IND vs NZ : ग्रीन पार्कमध्ये कानपुरिया स्टाईलमध्ये गुटखा खाणाऱ्या प्रेक्षकाची ओळख पटली

Published On: 

कानपूर: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ)यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरमध्ये खेळवला जात आहे. मात्र आता हा सामना एका वेगळ्याच कारणाने चर्चेत येत आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर प्रेक्षकांची संख्या बऱ्यापैकी दिसून आली. यातील एक दर्शक सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होत आहे. प्रत्यक्षात कॅमेरामनने एका व्यक्तीचा व्हिडिओ बनवला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. लाईव्ह टेलिकास्ट दरम्यान, कॅमेरामनने कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये गुटखा खाणाऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवले. हा व्हिडिओ फुटेज चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये सामना पाहण्यासाठी आलेला एक व्यक्ती तोंडात गुटखा घेऊन फोनवर बोलताना दिसत आहे. आता या व्यक्तीची ओळख पटली आहे.

स्टेडियममध्ये गुटखा, पान, सुपारी यांसारख्या वस्तूंवर बंदी आहे. अशा परिस्थितीत कानपूर पोलिसांनीही या व्यक्तीचा शोध सुरू केला होता. शोभित पांडे(Shobhit Pandey) असे या व्यक्तीचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये शोभितने त्याच्यासोबत बसलेल्या महिलेला बहीण म्हटले आहे. तो म्हणाला माझा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी माझ्यासोबत माझी बहीण बसली होती. मी गुटखा किंवा पान मसाला खाल्ला नव्हता, ती गोड सुपारी तोंडात होती. असे या व्यक्तीने म्हटले आहे.

दरम्यान या व्हिडिओनंतर सोशल मिडीयावर मिम्स चा अक्षरश पाऊस पडला. लोकांनी या व्यक्तीला प्रचंड ट्रोल केले आहे. दरम्यान भारताचा पहिला डाव 345 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरने 105 धावा केल्या. शुभमन गिलने 52 आणि रवींद्र जडेजाने 50 धावा केल्या. न्यूझीलंडच्या टीम साऊदीने 5 विकेट घेतल्या. किवी संघाचा पहिला डाव सुरु झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!