🕒 1 min read
मुंबई- आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली आहे. खा. सुप्रिया सुळे यांनी काल मुंबई येथील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात महिला संघटनेची बैठक घेतली. यावेळी सुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबई महानगरपालिका निवडणूक गांभीर्याने घेतली असून या काळात तळमळीने काम करणारे पदाधिकारी पक्षाला हवे आहेत, असे सांगताना सुळे म्हणाल्या की, ‘मुंबईतील महिला कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे काम करण्याची गरज आहे. वेळ पडल्यास जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले तरी चालेल. महिला कार्यकर्त्यांनी मुंबईकरांच्या विषयांना प्राधान्य देऊन काम करायला हवे.’
या बैठकीला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि वॉर्ड अध्यक्ष उपस्थित होत्या.महिलांनी आक्रमकपणे काम करण्यासाठी यापुढे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी मुंबईतील सर्व महिला पदाधिकारी, वॉर्ड अध्यक्ष आणि नगरसेवकांची बैठक होणार असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच मुंबईतील सहा जिल्ह्यांमध्ये जिल्हा स्तरांवर सहा मेळावे घेऊन महिलांना तयार करण्याचे काम करणार, असेही सुळे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- आता डिसले गुरुजीं आमदार होणार? दरेकर करणार शिफारस
- मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी आता पाच वकिलांची समन्वय समिती
- ‘स्वातंत्र्याची व्याख्या आज सोयीनुसार बदलली जाते’, राऊतांचा भाजपवर घणाघात
- जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचं निधन
- भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याचा 32 वा वाढदिवस


