Share

राष्ट्रवादीचा आमदाराने शहीद करकरेंच्या वर्दीत केला विधानभवनात प्रवेश

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये नेहमीच वेगवेगळ्या पोशाखात आंदोलन करत असतात. यावेळी त्यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या पोशाखात विधानभवनात एण्ट्री केली. यासोबतच गजभिये यांनी हातात फलक घेत “प्रज्ञाच्या शापाने मरण पावलेलो ही अंधश्रद्धा आहे, मी देशासाठी शहिद झालो”, असं त्यावर म्हटलेलं आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त विधान केले होते. “हेमंत करकरेंनी मला खूप त्रास दिला होता, म्हणून मी त्यांना श्राप दिलेला आणि त्यामुळेच त्यांचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर देशभरातून टीका करण्यात आली होती. यालाच प्रतिउत्तर देत आमदार प्रकाश गजभिये विधानभवनात शहीद हेमंत करकरेंच्या पोशाखात दाखल झाले होते.

दरम्यान, विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात गजभिये नेहमी वेगवेगळ्या पोशाखात येत असतात. गेल्यावर्षीही गजभिये शिवाजी महाराजांच्या पोशाखात आले होते. मात्र या पोशाखामुळे ते अडचणीत सापडले होते. यावेळीही विधानभवनाच्या गेटजवळ गजभिये यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!