🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून. सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. तसेच वेगवेगळ्या माध्यमातून स्टार प्रचारक मतदारांना आकर्षित करत आहेत.
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील अनोख्या पद्धतीने मतदारांना आवाहन केले आहे. यावेळी ते म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीत पैसे घ्या आणि दिवाळी साजरी करा, असे मिटकरी यावेळी म्हणाले. ते दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी इंदापुर येथे सभेदरम्यान बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, पैसे येणार तुम्ही पण घ्या, १० हजारांची कपडे आणा, १० हजारांचे फाटके आणा ते २४ तारखेसाठी आणा, अनारसे, चकल्या, मोती साबण अत्तर टकाटक दिवाळी साजरी करा असे यावेळी मिटकरी म्हणाले.
दरम्यान, अध्यक्ष मनसे राज ठाकरे यांनी देखील मामलेदार मिसळीचा आस्वाद घेतला. तसेच प्रत्येक पक्षाकडून मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी अनोख्या पद्धतीने प्रचार सुरु आहे. ‘जे वर्षावर नेणार आहेत, त्यांच्यासोबतचा हा वॉक होता’, असं म्हणत रविवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मरिन ड्राईव्ह परिसरात जनतेसोबत मॉर्निंग वॉक केला.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183256491840561154?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183248942105890816?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

