टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार आज ( शुक्रवार ) सायंकाळी ४ वाजता ‘NCP’ या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत फेसबुक पेजवरून फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत.
सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकाही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुका आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी ‘NCP’ या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत फेसबुक पेजवरून फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला होता.
त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवारही ‘NCP’ या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत फेसबुक पेजवरून फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. आज ( २८ जून, शुक्रवार ) सायंकाळी ४ वाजता अजित पवार जनतेशी संवाद साधणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते @AjitPawarSpeaks हे येत्या शुक्रवारी, दि. २८ जून रोजी, सायंकाळी ४ वाजता @NCPSpeaks या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत फेसबुक पेजवरून फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. #NCP2019 pic.twitter.com/tRLWRQBdoY
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 26, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

