🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभ निवडणूकींची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज्यात भाजपने कलम ३७० हटवण्याचा मुद्दा आपला स्वाभिमानाचा मुद्दा बनवत प्रचार सुरु केला आहे. तर राज्यातील प्रश्न सोडून ३७० चा उल्लेख का असा पवित्रा राज्यातील सर्वच विरोधीपक्षांनी घेतला आहे. अशातच कलम ३७० वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना एक खुले आव्हान दिले आहे.
हिम्मत असेल तर, जम्मू-काश्मीरबाबत स्पष्ट भूमिका घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला सामोरे जा. धाडस असेल तर, 370 आणि 35-अ कलम परत आणू, असे आश्वासन तुमच्या जाहीरनाम्यात द्या, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रचार सभा आज, जळगाव येथे झाली. त्यात त्यांनी कलम 370 रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादी जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या राष्ट्रहिताच्या निर्णयाला विरोध करत आहेत. शेजारी राष्ट्राची भाषा बोलत आहेत. पण, आमच्यासाठी जम्मू-काश्मीरबाबतचा निर्णय अटळ आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. आम्ही तिहेरी तलाकचा विषयही असाच तडीस नेला. काँग्रेससह अनेक पक्षांनी त्याला विरोध केला. पण, मुस्लिम माता भगिनींना दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘5 ऑगस्टला भारताने ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याआधी हा निर्णय घेण्याचे धाडस होत नव्हते. जम्मू-काश्मीरमधील जनतेला वंचित ठेवले जात होते. त्या परिस्थितीत फक्त स्वतंत्रतावाद आणि दहशतवादाचा विस्तार होत होता. जम्मू-काश्मीर आणि लडाख केवळ जमिनीचा तुकडा नाही. तर, भारताच मस्तक आहे. त्या जमिनीतील कण-कण भारताला मजबूत करते. जम्मू-काश्मीरमध्ये 40 वर्षे जी आसामन्या परिस्थिती होती ती सामान्य होण्याला चार महिनेही लागले नाहीत.’
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183361571600228352?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183358611507965953?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183355937764962304?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183349999200899073?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

