Share

तुल्यबळ समर्थकाचा अर्ज बाद झाल्याने राणेंना उत्तराधिकारी मिळेना

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : नारायण राणेंचा बालेकिल्ला असलेला कोकणातील कुडाळ – मालवण मतदार संघातूनच २०१४ मध्ये शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून राणेंना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर निवडणूक लढविणार नसल्याची प्रतिज्ञा राणे यांनी केली होती. आज पाच वर्षांनी या मतदारसंघात नारायण राणेंना तुल्यबळ उत्तराधिकारी सापडत नसल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत या मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर यांनी नारायण राणे यांची साथ सोडली. विधानसभा मतदार संघाच्या फेररचनेनंतर मालवण हा मतदारसंघ कुडाळला आणि कणकवली देवगडमध्ये जोडला गेला. यामुळे राणे यांनी मालवण-कुडाळ मतदारसंघ निवडला.

श्रीधर नाईक यांचे पुतणे वैभव नाईक यांचा २००९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्षवेधी मते मिळवत राणे यांनी त्यांचा जवळपास ३५ हजार मतांनी पराभव केला. मात्र, २०१४ मध्ये १० हजार मतांनी राणेंचा पराभव केला. यानंतर वांद्रे पूर्वमधून पोटनिवडणूक लढवूनही राणेंना पराभव पत्करावा लागला. यंदा कुडाळ-मालवण मतदारसंघात दत्ता सामंत, अॅड. संग्राम देसाई आणि सतीश सावंत या तीन राणे समर्थकांची नवे चर्चेत होती. सावंत हे राणेंचे अत्यंत जवळचे खंदे समर्थक आणि मागील २५ वर्षे ते राणेंसोबत होते. मात्र त्यांनीच राणेंचा मुलगा नितेश राणे यांच्यावर गंभीर आरोप करत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर नितेश राणेंविरोधातच शिवसेनेचा एबी फॉर्म मिळवत त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.

तर सामंत सरकारी कंत्राटदार असल्याने त्यांच्या अर्जावर आक्षेप घेत शेवटच्या क्षणी त्यांचा अर्ज बाद झाला आहे. यामुळे तितकाच तुल्यबळ असलेला दुसरा राणे समर्थकही बाद झाला. रणजित देसाईनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे आता राणेंची सारी भिस्त देसाई यांच्यावरच आहे. मात्र, देसाई यांची संघटनात्मक ताकद नसल्याने आमदार वैभव नाईकांना कितपात लढत देऊ शकतील याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!