मुंबई:- २०१९ विधानसभांच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबत असलेला संसार मोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यानंतर, हे तीनचाकी सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत करून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
या सरकारने वर्षपूर्ती केली आहे. तसेच, हे सरकार पुढील ५ वर्षे देखील टिकेल असं प्रत्युत्तर भाजप नेत्यांना देण्यात येत आहे. दरम्यान, हे सरकार मार्चनंतर दिसणार नाही असं भाकीत भाजप नेते नारायण राणे यांनी केलं आहे. हे सरकार टेम्परवरी (तात्पुरतं) आहेत. लवकरात लवकर ते मोठ्या रजेवर जाणार आहेत. तर, मार्चनंतर हे सरकार दिसणार नाही. आम्ही केंद्रातही आहोत आणि राज्यातही येणार, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. नारायण राणेंना भाजपात कोण विचारतंय? हे पंचांग घेऊन बसले आहेत. दरवेळी नव्या तारखा देण्यात काय तथ्य? त्यांचा पक्ष त्यांना किंमत देत नाही तर इतर काय देणार? सरकार आलं नाही म्हणून तडफड सुरू आहे, असा घणाघात गायकवाड यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वर्षाचा शेवट गोड! केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
- भारताला एक शक्तीशाली राष्ट्र म्हणून ओळख देण्यात काँग्रेसचे मोलाचे योगदान – बाळासाहेब थोरात
- ऑलिम्पिक पात्र खेळाडू राज्याचे वैभव, मुख्यमंत्र्यांनी थोपटली पाठ
- काँग्रेस पक्ष पुन्हा दिमाखाने उभारी घेईल, बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला विश्वास
- नववर्ष स्वागताला ‘बसायचा प्लॅन’ करत असाल तर सावधान, ‘अशी’ असेल नियमावली


