🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद जगजाहीर आहे. संधी मिळताच शिवसेना नेते आणि नारायण राणे एकमेकांवर टीका करताना दिसतात. यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनेच्या वचननाम्यातील १० रुपयात थाळी उपलब्ध करून देणार या घोषणेचा समाचार घेतला आहे.
नारायण राणे यांनी शिवसेनेच्या या घोषणेवर भाष्य करताना ‘शिवसेनेने त्यांच्या वचननाम्यात १० रुपयात थाळी अशी घोषणा केली आहे. पण ही थाळी ‘मातोश्री’वर बनवून देणार का? असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला विचारला आहे. तसेच कटुता संपवायची असेल तर ती दोन्हीकडून संपवायला हवी असंही ते म्हणाले आहेत.
पुढे बोलताना त्यांनी मला हा वचननामा हास्यास्पद वाटतो. शिवसेना हा वचननामा कसा पूर्ण करणार असा प्रश्न आहे. १० रुपयात थाळी ‘मातोश्री’वर बनवून देणार काय? १० रुपयात थाळी द्यायची असेल तर त्यात नुकसान होईल त्याचा निधी कुठून येईल? शिवसेनेने अगोदर त्यांचा जुना वचननामा पाहावा असं ते म्हणाले आहेत.
पुढे बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे सातबारा कोरा करू असे नेहमी म्हणायचे. पण झाला का कोरा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अगोदर सातबारा कोरा कसा करतात ते समजून घ्यायला हवं. शेतकऱ्यांचे प्रश्न, प्रशासनाची माहिती त्यांनी घ्यायला हवी असा सल्ला राणेंनी ठाकरेंना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183216597806149632?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183019244633485314?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183008771821330434?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

