मुंबई : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार ? हा प्रश्न अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला होता. यानंतर, नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सोपवला होता. यानंतर, काँग्रेसने नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली होती.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले व नवनियुक्त कार्याध्यक्ष तसेच उपाध्यक्ष हे शुक्रवार दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वा. ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथे आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रभारी श्री. एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत माजी प्रांताध्यक्ष, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नाना पटोले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवतील. या कार्यक्रमाला राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व जेष्ठ नेते, राज्य मंत्रीमंडळातील काँग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘अमित शहांना उद्घाटनासाठी कोकणात आणणारे राणे हे हुशार राजकारणी’
- ‘मी बंद खोलीत कधीच काही करत नाही, उद्धव ठाकरे खोटं बोलले’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- पवित्र जनादेशाचा अनादर करून महाराष्ट्रात तीनचाकी सरकार स्थापन झालं – अमित शाह
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

