Share

पंतप्रधान मोदींनी देशातील पर्यटन विकासाला औरंगाबादेतून सुरुवात करावी – इम्तियाज जलील

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ येथील लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात, मात्र विमानसेवा ठप्प झाल्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला असून त्यामुळेच येथील उद्योग क्षेत्र देखील डबघाईला गेले आहे, असे म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील पर्यटन विकासाला औरंगाबादेतून सुरुवात करावी, असे औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी म्हंटले आहे. जलील लोकसभेत बोलत होते.

इम्तियाज जलील यांनी लोकसभेच्या पहिल्या आधिवेशनात औरंगाबादच्या पर्यटन आणि उद्योगवाढीसाठी आपण काम करणार असल्याचे म्हंटले. इकेच नव्हे तर औरंगाबादचे ऐतिहासिक आणि भौगोलिक स्थान पाहता औरंगाबादला अजिंठा आणि वेरुळ या पर्यटन स्थळांमुळे जागतिक वारसा लाभला आहे, जगभरातील पर्यटक येथे येतात. मात्र जेटएअरवेज ही विमानसेवा कंपनी बंद पडली आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम औरंगाबादच्या पर्यटनावर झाला आहे, असे जलील यांनी म्हंटले.

याचबरोबर औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. तर औरंगाबादमध्ये उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. एअरलाईन बंद पडल्यामुळे अनेक उद्योग बंद पडली असून अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे एक एअरलाईन सुरू करण्यासाठी आम्ही संबंधित मंत्रालयात गेलो होतो. परंतु, जेट एअरवेजचे सर्व पाटलट दुसऱ्या कंपन्यांमध्ये शिफ्ट झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अडचण पायलटची नसून विमानसेवा ठप्प झाल्यामुळे पर्यटन इंडस्ट्री ढासळली आहे. याचा परिणाम उद्योगांवर झाला असल्याचेही जलील यांनी म्हंटले.

तसेच औरंगाबादहून कधीकाळी उदयपूर-जयपूर-दिल्लीला जोडणारी विमानसेवा सुरू होती. या सेवेचा पर्यटक मोठ्या प्रमाणात लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने किमान दोन एअरलाईन दिल्ली आणि मुंबईसाठी सुरू कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात पर्यटनावर भर देणार असल्याचे म्हटले होते, त्यामुळे मोदींनी देशातील पर्यटन विकासाला औरंगाबादेतून सुरुवात करावी, अशी मागणीही जलील यांनी केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!