🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेत्यांची एक मोठी फळी उतरलीय. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा रविवार आहे आणि आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली आहे.
मोदी यांच्या प्रचार सभांना गर्दी उसळली असली तरी सोशल मीडियावर मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात ट्विटरवर आज सकाळपासून #मोदी_परत_जा असा ट्रेंड पहायला मिळत आहे. ट्विटरवर वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत, तरुणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारला आहे.
भंडारा जिल्ह्यातल्या साकोली इथं झालेल्या दुसऱ्या सभेत पंतप्रधान मोदींनी विकासाचा अजेंडा घेऊनच भाषण केलं. अनुच्छेद ३७०, तीन तलाक यापैंकी कोणत्याही मुद्द्याला त्यांनी स्पर्श केला नाही. उलट महाराष्ट्रातील सिंचन, पर्यटनाला चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मोदी म्हणाले. आपल्या भाषणाची सुरूवात झाडीपट्टी या स्थानिक भाषेतून करत त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. तरीदेखील मोदींचे काही मुद्दे मात्र महाराष्ट्रातील जनतेला पटलेले दिसत नाहीत.
भाजपकडून कलम 370 रद्द केल्याचा मुद्दा प्रचारात मांडला जात आहे. त्यावर मराठी लोकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये नाराजी दिसत आहे. रोजगाराची सर्वांत मोठी समस्या असताना, भाजपमधून त्यावर ठोस काही बोलले जात नसल्यामुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्धच #मोदी_परत_जा ट्रेंड सुरू झाला आहे. या ट्रेंडमध्ये तरुणांनी मोदींचे अनेक मिम्स शेअर केले आहेत. तसेच आरेतील वृक्षतोड, मंदीचा फटका, जवळपास 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, असे गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. पुण्यातील प्रस्तावित रिंगरोडचा मुद्दाही एकाने उपस्थित केला असून, जुमलेबाजी नही चलेगी, असे म्हटले आहे.
Today's match is
Marathis vs IT Cell
Marathis won hands down with #मोदी_परत_जा
Score now
37.6K vs 15.5K ???????????? pic.twitter.com/dCzLCQUG0e
— James Wilson (@jamewils) October 13, 2019
We do no want #bulletTrain.#मोदी_परत_जा#GoBackModi @narendramodi @PMOIndia @bjp4mumbai @BJP4Maharashtra pic.twitter.com/ZB00MLWc6P
— विजय | ???????????????? | ವಿಜಯ | Vijay (@shyvijay) October 13, 2019
https://twitter.com/KalyanBirajdar4/status/1183274876234125312?s=20
Go back modi pic.twitter.com/5HuPmfRckQ
— Sandeep Das (@Sandeep66329701) October 13, 2019
Modi coming to Maha. For election.
Marathi People – #मोदी_परत_जा pic.twitter.com/YYX7uJWdku
— Omkar ???? (@OmParab5) October 13, 2019
Whenever @narendramodi says anything : #मोदी_परत_जा #Modi pic.twitter.com/cvcoi8I4mc
— Daksh Arora (@DakshArora007) October 13, 2019
#मोदी_परत_जा dear ups, why urudu people want to twit this? pic.twitter.com/71OP69hHPP
— சிவபவித்ரன் என்னும் நான் (@SivaNenu) October 13, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

