🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून. सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणमधील सभेदरम्यान विश्वास व्यक्त केला आहे.
यावेळी ते म्हणाले, ‘येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे आमदार निवडून येणार म्हणजे येणारच, कारण महाराष्ट्राला मी तशीच हाक दिली आहे. या सगळ्या सत्ताधाऱ्यांवर कोणाचा अंकुश ठेवायचा असेल, तर विरोधी पक्ष प्रबळ पाहिजे,’ असे ठाकरे यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना ठाकरेंनी सरकारला लक्ष केले यावेळी ते म्हणाले की, ‘आतापर्यंत विरोधी पक्षासाठी कोणीही मत मागितली नाही. कारण महाराष्ट्राची स्थिती अशी आहे. सरकारवर कोणतेही निर्बंध नाहीत. फक्त भाषण करायची. भाषण नाही थापा मारायच्या, असे म्हणत यांनी सरकारवर शाब्दिक निशाणा साधला.
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याला आता प्रबळ विरोधी पक्षाची गरज असल्याची मागणी केली. जो पर्यंत प्रबळ विरोधी पक्ष निर्माण होणार नाही तो पर्यंत जनतेचे प्रश्न सुटणार नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी जनतेला विरोधी पक्षाची धुरा माझ्या हातात द्या असे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183226701859278848?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183225373716180992?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

