Share

‘मोर्च्यांमागे पवारांचा हात आहे असं सांगणारे भाजपनेते आरक्षणाचे आज श्रेय घेत आहेत’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- मराठा समाजाला शिक्षणात १२ तर नौकरीत १३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या निर्णयाचं सगळीकडून कौतुक होत आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात आणि नोकरीत फायदा होणार आहे त्यामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्गात मराठा समाजाला मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार भास्करराव जाधव यांनी मराठा बांधवांना मनापासून शुभेच्छा दिल्या. उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत त्यांनी हा मराठा समाजाच्या बाजूने निकाल लागला, असे म्हणाले. तसेच राज्यात शिस्तबद्ध आंदोलने काढली, अहिंसेने आपल्या मागण्या मंजूर करून घेतल्या, हे मराठा समाजाने मोठे यश असल्याचे म्हणत मराठा आंदोलकांचे अभिनंदन केले.

मराठा समाजाच्या मोर्च्यांमागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवारसाहेबांचा हात आहे असे सांगणारे भाजपाचे नेते आज श्रेय घेत आहेत. परंतु हे आरक्षण लागू करण्याची सुरुवात आघाडी सरकारच्या काळातच झाली होती. असे भास्कर जाधवांनी सांगितले. मराठा समाजाला केवळ १२ आणि १३ टक्के आरक्षण लागू झाले असले तरी सरकारची १६ टक्के आरक्षण देण्याची मानसिकता दिसत नाही, असे आ. भास्करराव जाधव यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!