मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नुकतेच कोकणच्या दौऱ्यावर गेले होते त्या ठिकाणी त्यांनी जाऊन वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. थेट नुकसान झालेल्या लोकांशी जाऊन चर्चा केल्याने फडणवीस यांच्या दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली. यातच आता शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेचे देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत नुकतीच गुप्त भेट घेतली असल्याचे वृत्त समोर आल्याने आता पुन्हा फडणवीस यांचा हा दौरा चर्चेत आला आहे.
माजी खासदार निलेश राणे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे असून देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतं.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात राजकीय घडामोडी झाल्याचं आता समोर आलं आहे. उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस रत्नागिरी दौऱ्याच्या आधीच शासकीय विश्रामगृहात पोहोचले होते. इतरांच्या भेटीगाठी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं वृत्त आहे.
21 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा होता. परंतु त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 20 मे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी उदय सामंत रत्नागिरीत पोहोचले होते. दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु आपल्यावर लक्ष ठेवा असं उदय सामंत फडणवीसांना म्हणाल्याचं सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रियंका, कंगनाला भेटणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही’
- जाणून घ्या दोन कोटी लसीकरणाचा महाराष्ट्र सरकारचा दावा फसवा आहे का ?
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- ‘मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी संघटना तयार करून राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करावेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

