Share

‘मंत्री गायब, गुन्हाही दाखल नाही… मग सत्य कसं बाहेर येणार?’

Published On: 

संगमनेर: बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. नुकतीच तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तिनं आपली जीवनज्योत विझवली.

पूजा चव्हाणने स्वतः जीवनज्योत विझवली की तिला कोणी मारलं ? असा प्रश्न भाजपा महिला आघाडीने उपस्थित करून या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं आहे. या २२ वर्षीय तरूणीचे ठाकरे सरकारमधील कथित मंत्र्यांसोबत प्रेमसंबंध होते, त्यातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण गूढ मृत्यू प्रकरणावर भाजप नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाष्य केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मोठा दावा केला आहे. ‘पूजा चव्हाण प्रकरणात गुंतलेले असल्यानेच मंत्री गायब आहेत’, असे म्हणत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थेट संजय राठोड यांचं नाव न घेता हा दावा केला आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच जण सत्य बाहेर आलं पाहिजे असं सांगत आहेत. पण अजून मंत्रीच गायब आहे. गुन्हाही दाखल झालेला नाही. मग सत्य कसं बाहेर येणार? असा सवाल विखे-पाटील यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!