नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.
मात्र, देशाबाहेरील कलाकारांनी या आंदोलनावर भाष्य केल्यानंतर भारतातील सेलिब्रिटींच्या एका गटाने देशातील एकटा जपणं महत्वाचं असल्याचं म्हणत बाहेरच्या सेलिब्रिटींनी यात नाक खुपसू नये अशी समज दिली होती. इंटरनॅशनल पॉप स्टार रिहाना, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांच्यासह माजी अडल्ट स्टार मिया खलिफा हिनं देखील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं होतं.
यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मिया खलिफा हिने भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन केल्यापासून तिला ट्रोल करण्यात येत आहे. काही जणांनी तर पैसे घेऊन ट्विट करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, मिया खलिफाने शेतकरी आंदोलनाला समर्थन सुरु ठेवलं असून ट्रॉलर्सना जबरदस्त प्रत्युत्तर देखील दिलं आहे.
‘जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत ट्विट करत राहणार असल्याचं तिने सांगितलंय.’ अमेरिकन अभिनेत्री अमांडा सर्नीने देखील शेतकरी आंदोलनाला समर्थन दिलं आहे. यावरून तिला ट्रॉल केलं जात आहे. ट्रॉलर्सवर नाराजी व्यक्त करत तिने एक ट्विट केलं होतं. हेच ट्विट अमांडाने रिट्विट करून ट्रॉलर्सना प्रत्युत्तर दिलं आहे.
‘ जर आपल्याला भारतात सरकार पैसे देत असेल तर आपण #ad असा हॅशटॅग वापरायला नको का ?’ असा अप्रत्यक्ष टीका मियाने सरकारची बाजू घेणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींना लगावला आहे. तर, पुढे अमांडाला टॅग करून तिने ट्रोलर्सला लक्ष्य केलं आहे. यावर ‘हे ट्रोलिंग फक्त त्रास देण्यासाठी आहे, मला बरेच प्रश्न आहेत.. कोण मला पैसे देत आहे? मला किती पैसे मिळतात? मी माझं बिल कुठे पाठवू? मला पैसे कधी मिळतील? मी बरेच ट्विट केले आहेत. मला अतिरिक्त पैसे मिळतील का? ‘ असा चिमटा अमांडाने ट्रॉलर्सना काढला.
https://twitter.com/AmandaCerny/status/1358157488873472003?s=20
महत्वाच्या बातम्या
- ‘त्यांच्यात बंद दाराआड काय झाले ? हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही’
- फडणवीसांनी मराठा समाजाची दिशाभूल केलीये; समाजाने EWSच आरक्षण स्वीकारावं – संभाजी ब्रिगेड
- एका दगडात दोन निशाणे : अमित शाहांना प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी काँग्रेस नेत्यांना केलं टार्गेट!
- फडणवीसांच्या ‘अशा’ विधानांना मी गांभीर्याने घेत नाही – जयंत पाटील
- ‘सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना रेटून खोटं बोलण्याची सवय’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

