🕒 1 min read
औरंगाबाद: औरंगाबाद पुर्वचे महायुतीचे उमेदवार अतुल मोरेश्वर सावे,आणि फुलंब्री मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांच्या प्रचारासाठी शनिवारी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची जाहिर सभा होणार आहे. लोकसभेत बहुतम मिळालेल्या भाजपला विधानसभेसाठी चांगले वातारण आहे. मात्र तरीही भाजपाला महाराष्ट्रातील उमेदवारासाठी यावे लागत आहे. यासाठी थेट पंतप्रधानापासून ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्टात विविध ठिकाणी सभा घेत आहे.
दसऱ्याला भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बीडच्या सावरगाव घाट येथून प्रचाराचा नारळ फोडला. पंकजा मुंडेसाठी शहा यांची ही सभा होती. परळीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात थेट लढत होणार आहे. परळीत पंकजासाठी शहांना यावे लागले. एवढे नव्हेत तर आठवड्याभरात स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत सभा घेणार आहे. दोन दिवसापुर्वी शहा यांनी तुळजापुर,औसा येथे सभा घेतल्या. यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही परभणी येथे सभा घेतली. 13 ऑक्टोंबरला हिंगोली जिल्ह्यात योगीच्या सभा होणार आहे.
कॉंग्रेस राष्ट्रवादी मधून भाजपा प्रवेश केलेल्यांन आयाताना भाजपने तिकिट दिले. यात भाजपच्या निष्ठावंताना डावलले.याच आयातासाठी व जिथे टप फाईट आहे तिथे आता खुद्द पक्षाध्यक्षांना व पंतप्रधानाना प्रचारासाठी यावे लागत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसाठी पक्षातील प्रमुख नेते, आमदार,खासदार सोडून गेले आहे. यामूळे हे पक्ष खिळखिळे झाले असतानाही भाजपला आपले उमेदवार निवडुन आण्णासाठी मोठा जोर लावावा लगत आहे.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे सक्षम आहे. अनेकांना मी थकवू शकतो.असे सांगणाऱ्या बागडेसाठी राष्ट्रीय कार्यध्यक्षांसाठी सभा घेण्याची वेळ भाजपवर आली आहे. एकुणच महाराष्ट्रातील विरोधीपक्षा संपविल्यानंतरही भाजपला आपल्या उमेदवारांसाठी जोर लावावा लागत आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182952221744361472?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182930667455172608?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

