🕒 1 min read
मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असला तरी काही रुग्ण हे बरे देखील होत आहेत. या कोरोनाच्या संकटातून रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, इतर आरोग्य कर्मचारी हे मेहनत घेत आहेत. त्यांच्या कष्टामुळेच बरेच नागरिक आज कोरोनातून मुक्त झाले आहेत, त्यामुळे या नकारात्मक वातवरणात सकारात्मक बाबींकडे माध्यमांनी लक्ष द्यावे, अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे यांनी आज एक पत्रक काढत माध्यमांना आणि नागरिकांना आवाहन केले आहे. त्यात त्यांनी अस लिहील आहे की, कोरोनाशी निव्वळ महाराष्ट्रच नव्हे तर देश लढत आहे. आज बहुसंख्य नागरिक हे प्रशासनाने दिल्या आदेशांचे पालन करत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवू शकलो आहे.
तसेच अनेक कोरोनाबाधित आज बरे होत आहेत. त्यामुळे अशा सकारात्मक घटना देखील घडत आहेत. याकडे माध्यमांचे दुर्लक्ष होत आहे. जर या घटना माध्यमांनी दाखवल्या तर समाजामध्ये सकारात्मकता येईल. प्रशासन आणि डॉक्टरांवरचा विश्वास वाढेल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील बोलो आहे, असे राज ठाकरेंनी आपल्या पत्रकात लिहिले आहे.
#लढाकोरोनाशी #MaharashtraFightsCorona #Covid_19 @CMOMaharashtra @PMOIndia @TelanganaCMO @CMOGuj @AndhraPradeshCM @CMOKerala @CMofKarnataka @CMMadhyaPradesh @RajCMO @ChhattisgarhCMO @JharkhandCMO @CMOfficeUP @CMODelhi @CMOPb @CMOfficeAssam @CMOFFICEHP @CMOfficeWB pic.twitter.com/NHiHwHL3Ag
— Raj Thackeray (@RajThackeray) April 16, 2020
तसेच काही भागात कोरोनाबाधित रुग्णांना वाळीत टाकले जात आहे. हे चुकीचे असे केले तर कोरोनाबाधित घाबरून स्वतःचा आजार लपवण्याचा प्रयत्न करेल आणि याचा परिणाम सर्वांना भोगावा लागेल. त्यामुळे असे करू नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

