🕒 1 min read
मावळ ; मावळ तालुक्याने आजपर्यंत अनेक आमदार निवडून दिले आहे. पण यावेळी पहिल्यांदाच इतिहास होणार आहे, कारण मावळची जनता यावेळी मंत्री निवडून देणार आहे, असे मत प्रचारप्रमुख आणि भाजप नेते रवींद्र भेगडे यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केले आहे. मावळ तालुका भाजपचा बालेकिल्ला असून पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाळा भेगडे यांनी आज माळेगाव खुर्द, पिंपरी, कुणेवाडी, किवळे आदि गावांना भेट दिली. यावेळी रवींद्र भेगडे बोलत होते.
भेगडे म्हणाले की, आत्तापर्यंत तालुक्यातील रस्ते, वीज, पाणीपुरवठा या समस्या फक्त युतीच्याचं काळात संपल्या आहेत. इथून पुढच्या काळात पर्यटन, शेती, दुग्धव्यवसाय, स्वयंरोजगार या माध्यमातून महिला व तरुणांना रोजगार देण्याचा विश्वास रवींद्र भेगडे यांनी यावेळी दाखविला. तालुक्याला मंत्रिपद मिळाल्याने आपल्या तालुक्याची प्रतिमा राज्यात उंचावली आहे. मोठ्या प्रमाणात तालुक्याचा विकास होणार आहे. शासनाच्या विविध योजना या मंत्रिपद मिळाल्याने तालुक्यात आणता येणार आहे. आमदार असताना मर्यादा असतात परंतू मंत्रिपद आल्यावर विकासाला गती मिळणार आहे, असा विश्वास रवींद्र भेगडे यांनी यावेळी व्यक्त केला.
मावळातील राजकीय वातावरण चांगलेचं तापले आहे. महायुती आणि महाआघाडीचे दोन्ही उमेदवार तोडीसतोड असल्याने दोन्ही उमेदवारांकडून प्रचाराच्या फेऱ्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात बाळा भेगडे तिसऱ्यांदा नशीब अजमवण्यासाठी उतरले आहेत. तर त्यांच्या विरोधात महाआघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुनील शेळके यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही नेते तुल्यबळ असल्याने मतदारसंघातील चुरस चांगलीच वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182991005152239617?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182988730765701122?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182990356100468742?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

