टीम महाराष्ट्र देशा : भाजप खा. कपिल पाटील यांच्या संस्थेकडून करण्यात आलेला एक प्रताप समोर आला आहे. यामध्ये पाटील यांच्याकडून भरवण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात ११०१ जोडप्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आधीच विवाहित असलेल्यांची पुन्हा एकदा लग्न लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दैनिक सामनाने दिलेल्या वृत्तानुसार हा विवाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे.
कपिल पाटील यांच्या मतदारसंघातील शहापूर येथे हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी एकापेक्षा एक धक्कादायक प्रकार घडल्याच कळत आहे. जोडप्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आधीच मुले असणाऱ्यांचे विवाह तर लावण्यात आलेच परंतु अल्पवयीन मुलाचे लग्न देखील या सोहळ्यात झाल्याच कळतयं
दैनिक सामनाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. पुन्हा लग्न लावण्यात आलेल्या जोडप्यांना भांडीकुंडी आणि कपडे देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. दरम्यान, आयोजकाकडून देण्यात येणारी भांडी आणि कपड्यांमुळे हे विवाहित दुसऱ्यांदा लगीनगाठ बांधण्यासाठी तयार झाल्याचं सांगितल जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

