टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादीला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेत नाही. या दोन्ही पक्षांतून अनेक दिग्गज नेत्यांनी काढता पाय घेतला आहे. आता याच पक्षांतराच्या नाटकाचा पुढचा अंक मुंबईत पाहायला मिळणार आहे.
भायखळा (माझगाव) येथील काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांचा आज शिवसेनेत प्रवेश होणार आहे. ऐन निवडणुकीच्या धामधूमीत जामसूतकर यांच्या प्रवेशामुळे भायखळा विधानसभेत कॉग्रेससाठी मोठा धक्का बसला आहे.
मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत जामसुतकर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. जामसुतकर यांनी भायखळा विधानसभा उमेदवारीसाठी कॉग्रेसकडे मागणी केली होती. तर कॉग्रेसनेही त्यांची उमेदवारी निश्चित केली होती.
पण ऐनवेळी पक्षाने माजी आमदार मधु चव्हाण यांना उमेदवारी दिली. त्यामुळे जामसूतकर नाराज झाले. यानंतर मात्र माथाडी कामगारांचे पाठबळ असलेल्या जामसूतकर यांनी अखेर शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. जामसूतकर यांच्या पत्नी सोनम जामसूतकर या कॉग्रेसच्या माझगाव येथील विद्यमान नगरसेविका आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182203588270903296?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182203387737018369?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

