🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackrey) यांना मानेच्या आजारामुळे डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला हजर राहू शकले नाहीत. यावर भाजप नेते आक्रमक झाले असून तोपर्यंत मंत्रीमंडळातील एखाद्या मंत्र्याची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे. आता रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Aathwale) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanwis) यांना मुख्यमंत्री करण्याचा पर्याय महाविकास आघाडी सरकारला सुचवला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्याने राज्यात अनागोंदी कारभार सुरु आहे का? अशावेळी मुख्यमंत्रिपद इतर कोणाकडे सोपवावं? असा प्रश्न रामदास आठवले यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर रामदास आठवले म्हणाले, मला वाटतं की मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांकडे द्यावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत ही गोष्ट खरी आहे. अजून त्यांना ठीकठाक होण्यासाठी २- ३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. असे रामदास आठवले म्हणाले आहेत.
दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री नेमण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत असतानाही महाविकास आघाडी सरकार कोणताही निर्णय घेत नाही. त्यामुळे भाजपकडून कडाडून टीका होताना दिसून येत आहे. यासाठी आदित्य ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे असे पर्यायही भाजपाने पुढे केले आहेत. मात्र आता रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा पर्याय सुचवला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारत आणि सनातन संस्कृती या दोघांच्याही आत्म्याला दुखावण्याचा जो प्रयत्न करेल त्याला…’
- रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल; राष्ट्र्वादीचा इशारा
- रोहिणी खडसे हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत मांडणार- चंद्रकांत पाटील
- ‘…यामुळे सापसुद्धा चावतो ही आधीच माहीत असलेली गोष्ट नव्याने समजली’
- ‘संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना?’, रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल


