🕒 1 min read
मुंबई : छोट्या पडद्यावरील जय भानुशाली आणि माही विज यांची जोडी लोकप्रिय आहे. ते तीन मुलांचे पालकही आहेत. सध्या माही सोशल मीडियावर सक्रीय असते. जय आणि माहीने २०१७ मध्ये राजवीर आणि खुशी या दोन भावंडांना दत्तक घेतले होते आणि त्यानंतर २०१९ मध्ये त्यांच्या स्वतःच्या मुलीचा ताराचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर दत्तक घेतलेल्या दोन्ही मुलांना सोडून दिल्याची सोशल मीडियावर खूपच चर्चा सुरू झाली आहे. यावर आता माहिने एका मुलाखतीमध्ये उत्तरे दिली आहेत.
राजवीर आणि खुशी यांच्याबद्दल माहीनने सांगितले की, ‘या दोघांना आम्ही दत्तक घेतलेले नाही. तर या दोघांचे आम्ही पालक आहोत. त्यांचे वडील आमच्याबरोबर काम करतात. राजवीर आणि खुशी यांचा जन्म झाल्यापासून ते आमच्यासोबतच आहेत. त्यामुळे ते मला आई आणि जयला बाबा म्हणतात. आम्ही सर्वजण एका आनंदी कुटुंबाप्रमाणे एकत्र राहतो आहोत. परंतु आम्ही या दोघांना दत्तक घेतले आहे, ही गोष्ट कुठून आली हे मलाही कळलेले नाही. राजवीर आणि खुशी सध्या त्यांच्या आई- वडिलांसोबत गावी गेले आहेत. ते इथून गेल्यामुळे सोशल मीडियावर आमच्या मुलीचा जन्म झाल्यानंतर या दोघांना आम्ही सोडून दिल्याच्या चर्चा होत आहे’.
https://www.instagram.com/p/CLJgj3FhKsJ/?utm_source=ig_embed&ig_rid=621ee639-8e02-475a-9e63-ec150b89ebaa
या मुलाखतीनंतर माहीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तिने लिहिले की, ‘तुमच्यापैकी अनेकांनी आम्हाला विचारले तर अनेकजण स्वतःच ठरवत आहेत आणि काहीजण तर स्वतःहून काहीही लिहित आहेत. पण ते सर्व चुकीचे आहे. तारा आमच्या आयुष्यात एक आशीर्वादाच्या रूपाने आली आहे. परंतु त्यामुळे खुशी आणि राजवीर यांच्याबद्दल आमच्या मनात असलेली भावना बदलेली नाही. खुशी आल्यानंतरच आम्ही आई-वडील झालो आहोत. परंतु तिच्यावर पहिला हक्क तिच्या खऱ्या आई-वडिलांचा आहे आणि याची आम्हालाही जाणीव आहे.’
https://www.instagram.com/p/CHjz18Spg5T/?utm_source=ig_web_copy_link
पुढे तिने लिहिले की, ‘ खुशी आणि राजवीरच्या पालकांना वाटत होते की त्यांनी काही काळ त्यांच्यासोबत घालवावा. त्यामुळेच या दोघांना घेऊन ते त्यांच्या गावाला गेले. आम्ही तारासोबत मुंबईत आहोत. प्रत्येक पालक आपल्या मुलांबद्दल नेहमीच चांगला विचार करत असतात, याची जाणीव आम्हालाही आहे. त्यामुळे जे लोक खुशी आणि राजवीर संदर्भात आम्हाला चुकीच्या पद्धतीने प्रश्न विचारत आहेत आणि आम्ही त्यांना सोडून दिले आहे असे म्हणत आहेत. ते पूर्णपणे चुकीचे आहे. अशा प्रकारच्या चर्चा करू नका. जेव्हा आमची मुले मोठी होतील, तेव्हा त्यांच्यावर चुकीचा परिणाम होईल, असे माहिने या सुरू असलेल्या चर्चां उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून या चर्चा थांबविण्याचे आवाहन तिने केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियाचा ‘एक्स फॅक्टर’ जडेजा मुंबईत दाखल ; फोटो शेअर करत म्हणाला…
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- बारावीच्या परीक्षांचा निर्णय लवकरच; राज्य सरकारांना २५ मे पर्यंत सूचना देण्याची वेळनिलेश लंकेंच चहुबाजुंनी कौतुक; भाजप आमदार श्वेता महाले म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

