Share

पुणे शिक्षक मतदारसंघातही महाविकास आघाडीची सरशी; जयंत आसगावकर विजयी!

Published On: 

🕒 1 min read

पुणे:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरलाय. पुणे शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जयंत आसगावकर हे विजयी झाले आहेत.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसलाय. एलिमिनेशनच्या एकोणिसाव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांना १७ हजार ११७ मतं मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांना ११ हजार १६७ मतं मिळाली आहेत. भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांना अवघ्या ५ हजार ५७८ मतांवर समाधान मानावं लागलं आहेत. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातही महाविकास आघाडीच्या उमेदवाचा विजय निश्चित मानला जात आहे.

दरम्यान, पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!