पुणे : राज्यातल्या 288 मतदारसंघांपैकी 184 मतदारसंघांमध्ये भाजप-शिवसेना महायुतीनं निर्णायक आघाडी घेतली आहे. महाआघाडी 87 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे. इतर उमेदवार जागांवर आघाडीवर आहेत. भाजप 111 जागांवर तर शिवसेना 73 जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादी कॉंग्रेस 50 तर कॉंग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे.
महाआघाडीमधील अजित पवार बारामतीमधून, धनंजय मुंडे परळीत, विश्वजीत कदम पलूस कडेगावमधून, अमित देशमुख लातूरमधून, सुमन पाटील तासगाव आणिरोहित पवार कर्जत-जामखेड आणि दिलीप वळसे पाटील आंबेगाव मतदार संघातून आघाडीवर आहेत.
राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले दहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत. हरियाणामध्ये 90 जागांपैकी भाजपा 19 ठिकाणी, कॉंग्रेस 16, जननायक जनता पार्टी 7 तर इतर चार ठिकाणी आघाडीवर आहेत. इतर पाच राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकाचीमतमोजणीही आज सुरु आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजप 5, बसप 2, सप 2 तर कॉंग्रेस एकाजागी आघाडीवर आहे. गुजरातमध्ये तीन ठिकाणी कॉंग्रेस, भाजप 2 ठिकाणी आघाडीवर आहेत. पंजाबमध्ये कॉंग्रेस 3 ठिकाणी तर शिरोमणी अकाली दल एका ठिकाणी आघाडीवर आहेत.
जळगाव ग्रामीण 8 व्या फेरीअखेर आघाडीवर भाजपचे गुलाबराव पाटील 14000 मतांनीपुढे आहेत.नाशिक पश्चिममध्ये तिसऱ्या फेरीनंतर भाजपच्या सीमा हिरे यांनी सुमारे 10 हजार मते घेऊन काँग्रेसच्या डॉ.अपूर्व हिरे यांच्यावर आघाडी घेतली आहे. सीमा हिरे यांना सेनेचा मोठा विरोध होता तरीदेखील हिरे मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहेत.
मुंबईतील सर्व जागांवर महायुती आघाडीवर असून नागपूरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर मुंबईत वरळीमधून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीमधून, सुधीर मुनगंटीवार बल्लारपूरमधून आघाडीवर आहेत.
पुण्यातील आठ मतदारसंघांपैकी पाच ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. अचलपुर मतदारसंघात बच्चु कडू आघाडीवर आहेत.सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातूनशिवसेनेचे शहाजीबापू पाटील, मोहोळमधून शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर, पंढरपूरमधून सुधाकरपंत परिचारक, बार्शीतून दिलीप सोपल तर अक्कलकोटमधून भाजपचे सचिन कल्याणशेट्टी घाडीवर आहेत.
https://twitter.com/Maha_Desha/status/1187253171833327616?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1187252970187935745?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

