Share

राज्य सरकार ठेकेदारांचे पैसे देतं पण गरिबांसाठी पैसा खर्च करत नाही ; विनोद तावडेंचा घणाघात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करत असून नागरिकांना धान्य आणि इतर अत्यावश्यक सुविधा राज्य सरकार देत आहे असं सरकारी पक्षांकडून दावा केलं जात आहे. तर विरोधी पक्षाकडून सरकारकडून केलेले प्रयत्न पुरेसे नाही अशी टीका होत आहे.

आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे यांनी एका व्हीडीओतून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. एकीकडे केंद्र सरकार देशातील नागरिकांना आर्थिक आणि धान्य स्वरूपात मदत करत असताने राज्य सरकार काहीही मदत करत नाही तसेच ठेकेदारांचे पैसे देण्यास राज्य सरकारचा पैसा खर्च होतो पण गरिबांसाठी नाही असा घाणाघातही त्यांनी केला आहे.

काय म्हणाले विनोद तावडे –

केंद्र सरकार आपल्या वेगवेगळ्या खात्यात जसं आपला नेहमीचा पैसा खर्च करण्या बरोबरच अधिकचा पैसा हा जेष्ठ नागरिक असतील, अपंग असतील, दिव्यांग असतील, महिला असतील अश्यांच्या खात्यात जमा केला आहे आणि हा पैसा काढण्यासाठी रांगा लागल्या आहेत.

पण महाराष्ट्र सरकार एक दमडीही आरोग्य विभाग सोडून खर्चच करत नाही. ना धान्यावर करत, ना खाण्यावर करत, ना कुठल्याही व्यवस्थेवर करत. एकीकडे ३१ मार्चपूर्वी बांधकाम आणि इरीगेशन खात्याच्या ठेकेदारांचे पैसे देता आले. पण गरिबांसाठी पैसा राखून ठेवता आला नाही.

शासकीय कर्मचारी आणि पोलिसांचे पैसे तुम्ही कापता पण सामान्य माणसाला जे पैसे पाहिजे ते तुम्ही देत नाही.लोकांचे पैसे कापता पगाराचे आणि ठेकेदाराला तुम्ही पैसे देता हे कसा काय होत याच उत्तर राज्यातल्या जनतेला हवय.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!