औरंगाबाद : कोरोना चे रुग्ण औरंगाबाद मध्ये दिवसागणिक वाढत आहेत. त्याचं प्रमुख कारण म्हणजे औरंगाबादेत तुम्ही अगदी सहजपणे येऊ शकता आणि जाऊ शकता. रोज औरंगाबाद मध्ये येणाऱ्यांची संख्या आठ हजारापर्यंत पोहोचली आहे.
अतिशय कडक लॉक डाऊन असतानासुद्धा औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीत सर्वांसाठी खुल्या आहेत. तुम्हाला अगदी सहजपणे शहरात येता येते आणि तितक्याच सहजपणे तुम्ही शहरात न बाहेर जाऊ शकता. गेल्या तीन दिवसात जे दोन रुग्ण पॉझिटिव आढळले ते दोघेही ही मुंबईहून औरंगाबादला आले होते. त्यापैकी गरोदर महिला ही तर रुग्णवाहिकेला सोळा हजार रुपये देऊन शहरात दाखल झाली होती. या दोघांनीही आपण कोणत्या मार्गे शहरात आलो हे सांगितले नाही. पण औरंगाबाद शहरात दाखल होण्यासाठी तुम्हाला अनेक चोर रस्ते आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही अगदी सहजपणे पोलिसांच्या तपासणीशिवाय जाऊ शकता. जसं तुम्हाला बीड हुन औरंगाबादला यायचं आहे, तर तुम्ही शहागड पर्यंत सहज येऊ शकता. तिथून पैठण मार्गे तुम्ही औरंगाबादेत दाखल होऊ शकता. तर पुण्याहून येताना तुम्हाला गंगापूर मार्गे आंबेलोहळ हुन वाळूज एमआयडीसी मार्गे शहरात दाखल होता येते. तर नाशिक किंवा मुंबईहून येताना तुम्हाला पडेगाव मार्गे शहरात दाखल होता येते. जालना रोड वरूनही अशाच छुप्या मार्गाने शहरात येता येते. हे मार्ग पोलिसांना माहीत आहेत. पण त्या ठिकाणी गस्त किंवा चेक पोस्ट नाहीत म्हणून सहज येता आणि जाता येते.
महानगरपालिकेच्या चार रस्त्यांवरील तपासणी पथकाच्या अहवालानुसार शहरात रोज आठ हजार लोक नव्याने दाखल होत आहेत. ते कसे येतात आणि लॉक डाऊन असताना बाहेर कसे पडतात? हे प्रश्न अनुत्तरीत राहतात. म्हणून जिल्हाबंदी केल्याचे कितीही पोलिस सांगत असले तरी वास्तवात बंदी नाहीच, असे चित्र आहे. स्थानिकांना कोरोना ची लागण झाल्याचे कमी उदाहरणे आहेत. पण बाहेरून येणाऱ्यांना बाधा झाल्याची संख्या त्याहून अधिक आहे. म्हणून जिल्हा बंदी किंवा पोलिसांनी चेक पोस्ट वाढवण्याची गरज आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

